शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

रक्तपेढ्यांनी अधिक सतर्क रहावे

By admin | Published: July 03, 2016 12:15 AM

अनिल मडके : ‘लोकमत’तर्फे सांगलीत रक्तदान शिबिर उत्साहात

सांगली : विविध क्षेत्रात आलेली व्यावसायिकता, भेसळीचे प्रकार रक्तदानाच्या चळवळीलाही स्पर्श करू पाहात आहेत. त्यामुळे रक्त पेढ्यांमधील सामाजिकता टिकविण्याचे आव्हान आता निर्माण झाले आहे. त्यासाठी अशी सामाजिकता जोपासणाऱ्या रक्तपेढ्यांनी अधिक सतर्क रहायला हवे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांगली शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल मडके यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. शिरगावकर रक्तपेढीत रक्तदान शिबिर पार पडले. अनेक रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन मडके यांच्याहस्ते जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शिरगावकर रक्तपेढीचे सचिव उज्वल तिळवे, डॉ. सुभाष रुपनर, जनसंपर्क अधिकारी अरुणा साखवळकर आदी उपस्थित होते. मडके म्हणाले, रक्तपेढ्यांमधील डॉक्टर व कर्मचारी सामाजिकतेचे भान ठेवून काम करीत असतात. मात्र व्यावसायिकता डोळ््यासमोर ठेवून काही प्रवृत्ती या चळवळीसमोर अनेक अडचणी निर्माण करीत आहेत. अशावेळी रक्तपेढ्यांमधील कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम केले पाहिजे. एखादी छोटी चूकही एखाद्या रुग्णाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. खाद्यपदार्थांपासून अनेक अवयवांपर्यंत कृत्रिमतेचा प्रवेश झाला. कृत्रिम गोष्टींची निर्मिती होत असताना अद्याप रक्ताच्या बाबतीत अशी कृत्रिमता आलेली नाही. केवळ रक्तदानच नव्हे, तर आता रक्तघटकांचे दानही महत्त्वाचे बनले आहे. त्यादृष्टीनेही जागृती झाली पाहिजे. अनेकदा एकाचवेळी रक्ताचे मोठ्या प्रमाणावर दान होते, तर एखाद्यावेळी तुटवडा निर्माण होतो. रक्ताचा तुटवडा कधी निर्माण होऊ नये, तसेच दुर्मिळ रक्तदात्यांची यादी तयार करून त्यानुसार रुग्णांना मदत करणारी यंत्रणा उभी रहावी, असे ते म्हणाले. अरुणा साखवळकर म्हणाल्या की, रक्तपेढ्यांबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा त्यांनी रक्तदान केल्यानंतर पेढ्यांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा बाळगतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर रक्तपेढ्यांना दोष दिला जातो. वास्तविक रक्तपेढ्यांच्याही बऱ्याच अडचणी आहेत. त्या लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)