शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

गुंडाचा पाठलाग करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:00 AM

सांगली : खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी दरिकांत कांबळे (वय ३५, रा. दडगे प्लॉट, आयटीआय-जवळ, संजयनगर, सांगली) याचा पाठलाग करून कुकरीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ...

सांगली : खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी दरिकांत कांबळे (वय ३५, रा. दडगे प्लॉट, आयटीआय-जवळ, संजयनगर, सांगली) याचा पाठलाग करून कुकरीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कॉलेज कॉर्नर येथील हॉटेल अक्षरमजवळ हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.खुनासह इतर गंभीर गुन्ह्यातील सहभागामुळे सनी कांबळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तो मोपेडवरून (एमएच १० डीए १३८३) हॉटेल अक्षरमजवळ आला होता. त्यानंतर तो हॉटेलसमोरच्या कमी रहदारीच्या रस्त्यावरून चालला होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडवत त्याच्यावर कुकरीने हल्ला केला. त्याला काही कळायच्या आतच हल्लेखोरांनी सपासप वार केले. पहिला वार डोक्यात झाल्यानंतर सनी कांबळेने बचावासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्याच अंतरावर जाऊन तो कोसळल्याने हल्लेखोरांनी पुन्हा त्याच्यावर वार केले. तो निपचित पडल्यानंतर हल्लेखोरांनी कुकरी तेथेच टाकून पलायन केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कांबळे यास उपचारासाठी रिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हल्लेखोर तीन ते चार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. सायंकाळी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.श्वान परिसरातच घुटमळलेघटनेनंतर तात्काळ श्वानपथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानास तेथे पडलेल्या हत्याराचा वास देण्यात आल्यानंतर श्वानाने आॅटो इंडियाच्या मागील रस्त्यावरून सर्किट हाऊसपर्यंतचा माग दाखविला व त्या परिसरातच ते घुटमळले. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी मोहीम राबविली.बघ्यांची मोठी गर्दीनेहमीच गजबज असलेल्या कॉलेज कॉर्नर चौकापासून अगदी जवळच ही घटना घडल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. कॉलेज कॉर्नरकडून रतनशीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर व दुर्गामाता मंदिराजवळून मागे जाणाºया मार्गावर नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांना वारंवार गर्दी हटवावी लागत होती.गुंड सनी कांबळे याच्यावर अनेक गुन्हे३० एप्रिल २०१६ ला कलानगर येथील रेल्वे पुलाजवळ झालेल्या गुंड रवी मानेच्या खून प्रकरणात सनी कांबळेचा सहभाग होता. जानेवारी २०१२ मध्ये झालेल्या घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सुभाष झांबरे यांच्या खून प्रकरणातही त्याचा सहभाग होता. परंतु पुराव्याअभावी कांबळेसह इतर संशयितांची निर्दोेष सुटका झाली होती. २०१३ मध्ये त्याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली होती. मारामारीसह इतर गंभीर गुन्ह्यांतही त्याचा सहभाग होता. अलीकडे मात्र गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा सहभाग कमी होता.