इस्लामपुरातील रक्तदान शिबिराचे उद्घाटन एल. एन. शहा, कपिल ओसवाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अमित ओसवाल, प्रकाश शहा, राजेंद्र पोरवाल, नीलेश शहा उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मानवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आज मानवाने एकत्रितपणे एकसंघ होऊन या अदृश्य शक्तीशी सामना करण्याची हीच खरी वेळ आहे. म्हणून संपूर्ण जीवनसृष्टीला ‘जगा आणि जगू द्या’ हा महान संदेश देणारे अहिंसामय जीवन कसे जगावे हे शिकविणारे भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
श्री वासुपूज्य जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ व जायंटस् ग्रुप आॅफ मेट्रो इस्लामपूर यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले योगदान दिले. हे रक्तसंकलन प्रकाश मेमोरियम ब्लड बॅँकेने केले.
या कार्यक्रमाला श्री वासुपूज्य जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ अध्यक्ष एल. एन. शहा, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल, संघ ट्रस्टी प्रकाश शहा, राजेंद्र पोरवाल, नीलेश शहा यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून शिबिरात सुरुवात झाली. या कार्यक्रमाला युनिट ऑफिसर जितेंद्र रायगांधी, जायंटस् मेट्रो ग्रुपचे अध्यक्ष गोविंद कोठारी, अनुज अग्रवाल, कपिल गांधी, गौतम कोठारी, मयूर ढबू, कल्पेश पोरवाल, कमलेश ओसवाल, राहुल देसाई, प्रवीण पारवाल, जितू रायगांधी व सामाजिक कार्यकर्ता राकेश कोठारी व मनोज भंडारी उपस्थित होते. उमेश रायगांधी यांनी प्रास्ताविक केले. विजय पवार यांनी आभार मानले.