कुपवाड : दक्षिण भारत जैन सभेच्या कुपवाडमधील वीर सेवा दल शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढू लागल्याने रक्ताची टंचाई सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यामुळे एक समाजसेवा म्हणून वीर सेवा दल शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महावीर जयंतीनिमित्त येथील मोठे जिन मंदिर आवारात आयोजित शिबिरात ५१ जणांनी रक्तदान करून योगदान दिले. मिरज सेरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकेच्या सहकार्याने शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी युवा नेते सागर खोत व शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष प्रमोद गौंडाजे यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
वीर सेवा दल शाखेचे संघनायक महावीर गतारे, उपसंघनायक सुमीत हसुरे, रणजीत पाटील, वैभव गौंडाजे, अभिषेक नरदेकर, प्रथमेश करनाळे, सम्मेद कवठेकर यांनी शिबिराचे आयोजन केले.
फाेटो : २८ कुपवाड १
ओळ : कुपवाडमध्ये रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना सागर खोत, प्रमोद गौंडाजे, महावीर गतारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.