बोरगाव : गौंडवाडी (ता. वाळवा) येथील स्व. पांडुरंगदादा रंगराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरपंच अधिक चव्हाण यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही उणीव लक्षात घेऊन सरपंच अधिक चव्हाण यांनी आपले वडिलांच्या पुण्यस्मरणास होणार खर्च व गर्दी टाळत व कोरोना महामारीतील गरजूंची गरज ओळखून रक्तदान शिबिर घेतले होते. यात ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन डाॅ. रवी यादव, माजी सरपंच रघुनाथ साळुंखे, सरपंच अधिक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच रघुनाथ साळुंखे, गौंडवाडी सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, सरपंच योगेश लोखंडे, उपसरपंच जालिंदर चव्हाण, विजय शहा, सुरेश पुदाले, सुरेश सावंत, विश्वनाथ चव्हाण, बालाजी पंचाळ, सागर चव्हाण, वैभव चव्हाण, शशिकांत चव्हाण, तसेच राजारामबापू रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.