-------------
घननिकीत लसीकरणास सुरुवात
आटपाडी : घननिकी (ता. आटपाडी) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. भूमिका बेरगळ, सरपंच विक्रम दाईंगडे, उपसरपंच विद्या पवार, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पवार, जावेद काझी, शिवाजी येळे आदी उपस्थित होते.
-------------------
आशा वर्कर्सना कायम सेवेत घेण्याची मागणी
डफळापूर : कोरोनाच्या काळात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी लोकसभेत आवाज उठवावा, अशी मागणी लाल बावटा, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशासेविका कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. यामुळे त्यांना कायम सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी मीना कोळी, हणमंत कोळी, परशुराम चव्हाण आदी उपस्थित होते.
---------------
झरे येथे लसीकरणास सुरुवात
आटपाडी : झरे (ता.आटपाडी) येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते लसीकरण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ब्रह्मानंद पडळकर, नारायण चवरे, प्राचार्य अशोक पडळकर, धनंजय वाघमारे, अधिक माने, दिलीप खिलारी, आप्पा भानुसे, डॉ. महेश जाधव आदी उपस्थित होते.
--------------
सांगलीत पोलिसांना ताकवाटप
सांगली : कोरोना संकटात उन्हाचा जोर वाढत आहे. अशा स्थितीतही पोलीस कर्मचारी रस्त्यावर आपली जबाबदारी पार पाडत आहेत. याची जाणीव ठेवत भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा माधुरी वसगडेकर यांनी शहरात विविध ठिकाणी पोलिसांना ताकवाटप केले.
----------------
बिसूर येथे कोरोना लसीकरण
सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर आरोग्य केंद्र अंतर्गत बिसूर उपकेंद्रात नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. आत्तापर्यंत ६९० नागरिकांना लस देण्यात आली आहे. डॉ. प्रियांका पाटील, आरोग्यसेवक बी.आर. वाघमारे, आरोग्यसेविका शाकिरा उमराणी, आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी नियोजन केले होते.
-------
नियमांचे पालन
सांगली : सध्या कोरोनाच्या संकटातही बँकेमधील कर्मचारी सेवा देत आहेत. कोरोना नियमांचे पालन करून बँका सुरू आहेत. ग्राहकांकडूनही योग्य प्रतिसाद मिळत आहे.
----------
उलाढाल ठप्प
शिगाव : लॉकडाऊनमुळे आठवडा बाजार बंद आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची उलाढाल सध्या ठप्प आहे. काही शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे.