लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे माजी सरपंच भीमराव पाटील अण्णा यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, डॉ. रणजित पाटील, कर्मवीर संस्थेचे सचिव प्रा. अनिल पाटील, भैरवदेव पतसंस्था संस्थापक सुनील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष छाया पाटील, तानाजी माने, छगन पाटील, बंडाकाका पाटील, डॉ. स्मिता पाटील, सतीश गायकवाड उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये कामेरी परिसरातील ९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. स्मिता पाटील यांच्या प्रयत्नामुळे महिला, भगिनींनीही मोठ्या संख्येने रक्तदान केले. हंबीरराव जेडगे यांनी प्रास्ताविक केले. तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय पाटील, मयूर गायकवाड, राजवर्धन पाटील, प्रशांत पवार, धीरज पाटील यांनी संयोजन केले. प्रा. संजय पाटील यांनी आभार मानले.