लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त युवा नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते आज (रविवार) सकाळी साडेसातला कारखाना कार्यस्थळावर बापूंच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन केले जाणार आहे. कोरोना व महापुराच्या संकटकाळाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सर्व युनिट कार्यस्थळावर रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल शाखा, कारंदवाडी युनिट व तिप्पेहळ्ळी (जत) युनिट कार्यस्थळावर सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. साखर कामगारांसह इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सुरक्षित अंतर पाळावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव प्रताप पाटील, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर संयोजन करीत आहेत.