वाटेगाव : रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन नवे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिरे उपयुक्त पडतात, असे प्रतिपादन १०८ स्वभावसागर महाराज यांनी केले.
श्री धर्मगिरी तीर्थक्षेत्र (ता. शिराळा) येथे कविरत्न धर्मसागर मुनी महाराज यांच्या ४९ व्या समाधी दिवस, १०८ परमेष्टी विद्याभूषण महाराज यांचा १६ वा समाधी दिवस, १०८ सुखसागर महाराज यांचा ७ वा समाधी दिवस, १०५ आर्यिका धर्ममती माता यांच्या दुसऱ्या समाधी दिवसानिमित्त धर्मगिरीवर हा दिवस शाहिरांचा व रक्तदान शिबिर पार पडले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन धर्मगिरी क्षेत्राचे उद्धारक, धर्मसागर व स्वभावसागर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बांबवडेच्या सरपंच कोमल पाटील, विश्वासचे संचालक विश्वास पाटील, सुकुमार पाटील, माणिक शेटे,चंदू शेटे, हनमंत पाटील, अनुप करांडे, पीयूष करांडे यांच्याहस्ते करण्यात आले. आचार्य श्री तुलशी ब्लड बँक, जयसिंगपूर, अरिंजय शिरोटे यांच्या पथकाने रक्त संकलन केले. यावेळी शीतल शेटे, विजय शेटे, अजित शेटे उपस्थित होते. सुभाष चौगुले, उज्ज्वला चौगुले यांनी आहार दान केले. यावेळी राजश्री शेटे यांनी मार्गदर्शन केले. निवृत्त न्यायाधीश कल्पना होरे, प्रकाश पाटील, डॉ. महावीर हांजे, कुमार कोकरे, धनपाल खोत, राजकुमार पाचोरे, भरत सावकार आदी उपस्थित होते.
फोटो - १४०१२०२१-आयएसएलएम-वाटेगाव रक्तदान न्यूज
श्री धर्मगिरी येथे रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी कोमल पाटील, विश्वास पाटील, सुकुमार पाटील, अनुप करांडे व इतर.