मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी व पद्मभूषण वसंतदादा पाटील रक्त पेढी सांगली यांच्यातर्फे जागतिक रक्तदाता दिवस मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. यानिमित्त रांगोळी व पोस्टर स्पर्धा, रक्तदान शिबिर आयोजक व २५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.
अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. प्रदीप दीक्षित, डॉ. रजनी जोशी, डॉ. रुपेश शिंदे, डॉ. अनिता बसवराज, डॉ. अलका गोसावी, डॉ. यास्मिन मोमीन अधिसेविका वंदना शहाने उपस्थित होते. यानिमित्त रांगोळी व पोस्टर स्पर्धा, रक्तदान शिबिर आयोजक व रक्तदात्यांचा सत्कार, स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
डॉ. अलका गोसावी यांनी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. प्रदीप दीक्षित यांनी रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजकांना मार्गदर्शन केले. डॉ. यशवंत शेंडे, डॉ. सम्राट कोळेकर, डॉ. सुशांत चिपरगे यांनी व रक्तदानाविषयी जनजागृती व रक्तदानाचे महत्त्व सांगितले. रक्तदान शिबिर आयोजकांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अमृता खाडे -भोसले, डॉ. जगदीश यांनी सूत्रसंचालन केले. रक्तपेढी प्रमुख डॉ.यास्मिन मोमीन यांनी आभार मानले.