शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

मगरीने ओढून नेलेला मेंढपाळाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2016 8:24 PM

मेंढपाळ संजय गंगाराम भानुसे (वय ४५) यांच्यावर शुक्रवारी कृष्णा नदीकाठी मगरीने हल्ला करून त्यांना नदीत ओढून नेले.

ऑनलाइन लोकमत 
कसबे डिग्रज, दि. १५ -  मिरज तालुक्यातील तुंग येथील मेंढपाळ संजय गंगाराम भानुसे (वय ४५) यांच्यावर शुक्रवारी कृष्णा नदीकाठी मगरीने हल्ला करून त्यांना नदीत ओढून नेले. शनिवारी सकाळी कसबे डिग्रज जॅकवेल परिसरात कृष्णा नदीत त्यांचा मृतदेह सापडला. यावेळी घटनास्थळी कुटुंबियांनी आक्रोश केला. वनविभागाने तातडीची मदत म्हणून २५ हजारांची मदत जाहीर केली.
 
शुक्रवारी दुपारी संजय भानुसे, सचिन हराळे मेंढ्या घेऊन कृष्णा नदी परिसरात गेले होते. त्यावेळी संजय भानुसे यांच्यावर १२ फुटी मगरीने हल्ला केला. त्यावेळी लोकांनी आरडाओरड केली, पण मगरीने संजय यांना नदीपात्रात ओढत नेले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तुंग, कसबे डिग्रजचे तरुण दोन होडीतून शोध घेत होते. 
पण रात्री उशिरापर्यंत काही सापडले नाही. पुन्हा शनिवारी सकाळीही शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी कसबे डिग्रज जॅकवेल परिसरात संजय यांचा मृतदेह सापडला. उजवा हात, कंबर, पाय अशा विविध ठिकाणी मगरीचे नऊवेळा दात लागल्याचे दिसले. 
 
हातावरही मोठ्या जखमा होत्या.
गतवर्षी जून महिन्यात झालेल्या मगर गणनेत भिलवडी डोह ते सांगली पूल परिसरात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या आहेत. आतापर्यंत आठ बळी गेले आहेत, तर ४० जण मगर हल्ल्यात जखमी झाले आहेत. कृष्णा नदीकाठाला मगरसंरक्षक जाळी बसविण्याची मागणी सरपंच विशाल चौगुले, संतोष पिंपळे यांनी वनअधिकारी संजय चव्हाण, ए. बी. निंबाळकर, डी. ए. भोसे यांच्याकडे केली.