शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

बोगस कीटकनाशकांचा विषारी विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 1:09 PM

अत्यंत विषारी कीटकनाशक तयार केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने २७ लोकांची समिती गठित केली असून, तिच्या मंजुरीनंतरच कीटकनाशक विक्रीसाठी परवाना देण्यात येतो. या परवान्याची सत्त्वपरीक्षा टाळण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी परवाना न घेताच काही कंपन्या अत्यंत विषारी कीटकनाशके तयार करीत आहेत. बोगस कंपन्यांची हीच नफेखोरी शेतकºयांच्या जिवावर बेतत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांच्या जिवाशी खेळ नफेखोरीसाठी शासनाची मान्यता न घेताच औषधांची विक्रीकृषी विभागाची बघ्याची भूमिका

अशोक डोंबाळे 

सांगली,9 : अत्यंत विषारी कीटकनाशक तयार केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने २७ लोकांची समिती गठित केली असून, तिच्या मंजुरीनंतरच कीटकनाशक विक्रीसाठी परवाना देण्यात येतो. या परवान्याची सत्त्वपरीक्षा टाळण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी परवाना न घेताच काही कंपन्या अत्यंत विषारी कीटकनाशके तयार करीत आहेत. बोगस कंपन्यांची हीच नफेखोरी शेतकºयांच्या जिवावर बेतत आहे.

कीटकनाशकाचे प्रमुख्याने अत्यंत विषारी, फार विषारी, साधारण विषारी आणि किंचित विषारी असे चार प्रकार आहेत. ही कीटकनाशके विक्रीसाठी पाठविताना किमान दीड ते तीन वर्षे त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतात. या कीटकनाशकांना मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने २७ जाणकारांचे कृषी विभागाचे बोर्ड तयार केले आहे. यामध्ये कृषी शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, शेतकरी, लोकप्रतिनिधी, औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

कोणत्याही कंपनीने औषध तयार केल्यानंतर केंद्रीय समितीपुढे ते कीटकनाशक शेतकºयांच्या आरोग्यासाठी घातक नाही ना, औषध फवारणी करतानाशेतकºयांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्या औषधामध्ये कोणते घटक आहेत, याची सर्व माहिती औषधाच्या बाटलीवर लावणे संबंधित कंपन्यांना बंधनकारक केले आहे.

अत्यंत विषारी कीटकनाशक तयार करण्यासाठी एका कंपनीला किमान तीन वर्षे संशोधन करावे लागते. जवळपास तीन कोटी रुपयांचा खर्च येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचविण्यासाठी आणि केंद्रीय बोर्डाची सत्त्वपरीक्षा टाळण्यासाठी काही कंपन्या अत्यंत विषारी औषधांची निर्मिती करून ती शेतकºयांच्या माथी मारत आहेत. औषध दुकानदारांना भरमसाट कमिशन देऊन ते शेतकºयांच्या माथी मारत आहेत. औषध फवारणी करणाºयांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोच.

यापेक्षाही ज्या पिकांवर फवारणी केली जाते, ती पिके, फळे, भाजीपाला खाण्यासही अपायकारक आहे. याची कृषी विभागाच्या सर्वच अधिकाºयांना जाण आहे. तरीही ते जाणीवपूर्वक या अत्यंत विषारी कीटकनाशकांच्या बोगस कंपन्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी केला आहे. याप्रमाणेच काही पर्यावरणप्रेमी शेतकºयांचाही आरोप आहे.कीटकनाशक कायद्याची अंमलबजावणीच नाही

राज्यात कीटकनाशक कायदा-१९६८ व कीटकनाशक नियम-१९७१ मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. नफाखोरीसाठी कंपन्या शेतकºयांच्या जिवाशी खेळत असून, त्यांना शासन व अधिकाºयांचे अभय आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी केला आहे.

मे-१९५८ मध्ये केरळ व चेन्नई येथे दोषपूर्ण कीटकनाशकांमुळे शेकडो शेतकºयांचे बळी गेले होते. त्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन समितीने कीटकनाशकांचे उत्पादन, वितरण, विक्री व उपयोगाचे नियमन करण्यासाठी कायदा तयार करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार देशात २ सप्टेंबर १९६८ पासून कीटकनाशक कायदा लागू करण्यात आला आहे. कायद्यातील कलम ३६ अ नुसार कीटकनाशके वापरासंदर्भात नियम तयार करून ते १९७१ पासून लागू करण्यात आले.

कायदा व नियमानुसार शेतकºयांना कीटकनाशक वापरासंदर्भात प्रशिक्षण देणे, कीटकनाशकांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करणारे कपडे देणे व कीटकनाशकांपासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

फवारणी करताना शेतकºयांनी घ्यावयाची काळजी...

  1. फुगलेले, गळके, फाटके डबे, बाटल्यांतील कीटकनाशके खरेदी करू नका
  2. मुदतीत असल्याची खात्री करा
  3. फवारणी करताना पूर्ण शरीर झाकून घ्यावे, हातमोजे, बूट, गॉगल, मास्कचा वापर करा
  4. दुपारच्या उन्हामध्ये किंवा वादळी वारा असताना विरुध्द दिशेला फवारणी करू नये
  5. प्रमाणित व मान्यताप्राप्त कंपनीचेच कीटकनाशक खरेदी करा
  6. बादली व इतर औषध तयार करताना वापरलेली