शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मोराळेतील भोंदूबाबाचा अंनिसकडून पर्दाफाश -दहा वर्षांपासून भोंदूगिरी; पोलिसांच्या ताब्यात; दर गुरुवारी भक्तांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:53 PM

मांजर्डे : मोराळे (ता. तासगाव) मधील भोंदूबाबा भालचंद्र पाटील याचा अंनिस व तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला.

ठळक मुद्देजादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तासगाव पोलिसांनी या भोंदूबाबाला ताब्यात घेतलेप्रत्येकवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीला मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन

मांजर्डे : मोराळे (ता. तासगाव) मधील भोंदूबाबा भालचंद्र पाटील याचा अंनिस व तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. भालचंद्र पाटील याचा मोराळे गावात गेल्या दहा वर्षांपासून भोंदूगिरीचा कारनामा सुरू होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या भोंदूबाबाला घटनास्थळावरच ताब्यात घेतले.

भालचंद्र पाटील (मूळ गाव मोराळे, पेड) याचा मागील दहा वर्षांपासून जादूटोणा करणे, अंगातील भूत काढणे, शारीरिक व्याधी दोन मिनिटामध्ये घालविणे, असा भोंदूगिरीचा उद्योग सुरू होता. याचा प्रचार महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांत झाला आहे. दररोज येथे अनेक भक्त भेट देतात.

दर गुरुवारी येथे भक्तांचा मेळावा असतो. याबाबतची नोंद ठेवण्यासाठी येथे रजिस्टरही उपलब्ध आहे. हा भोंदूबाबा, ‘मला दत्त महाराजांची आज्ञा येते. प्रत्यक्षात देवही माझ्याशी बोलतो. त्यानुसार मी पुढील कार्य करतो’ असे सांगून तो भक्तांवर उपचार करतो. यावेळी उपचारादरम्यान अनेक भक्तांच्या अंगात येते. यामध्ये अज्ञानी भक्तांबरोबर उच्चशिक्षित भक्तांचाही समावेश आहे. येथे भक्तांवर मोफत उपचार केला जातो, मात्र या ठिकाणी पैसे गोळा करण्यासाठी पावती व अन्नदान पेटी ठेवली आहे.

भक्त स्वखुशीने या ठिकाणी आपला खिसा रिकामा करतात. मागील दहा वर्षांपासून त्याच्या या उद्योगाला भक्त बळी पडले आहेत. त्याच्यावर मागील काही दिवसांपासून अंनिस लक्ष ठेवून होती. याबाबत पोलिस महानिरीक्षक विश्वास नागरे-पाटील यांच्याकडेही अंनिसने तक्रार केली होती. शेवटी त्याच्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली.

प्रत्येकवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीला मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी किमान दहा हजार भक्त उपस्थित राहतात. याची माहिती मिळताच जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तासगाव पोलिसांनी या भोंदूबाबाला ताब्यात घेतले. हे सर्व भगवंताच्या कृपेने चालले आहे, पोलिस मला फाशी देत नाहीत. सर्वांनी शांत राहा, असे आवाहन त्याने भक्तांना केले. तासगावच्या पोलिस निरीक्षक प्रियांका सराटे, हवालदार वनवे, ए. एस. थोरवडे, पोलिस नाईक माने, पी. एन भोळे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी अंनिसचे डॉ. विवेक गुरव, शरद शेळके उपस्थित होते.पोलीसच लाभार्थी...या भोंदूबाबाचे दर्शन घेण्यासाठी अडाणी व उच्चशिक्षित भक्तही दररोज उपस्थित होतात. यामध्ये चक्क विटा येथील सोमनाथ पाटील या पोलिसाचा व त्याच्या पत्नीचा समावेश असल्याचे पाहून उपस्थित थक्क झाले. यावेळी चक्क हा भोंदूबाबाच म्हणाला, पोलिससुद्धा भक्त आहेत. त्यामुळे यावेळी या बाबाचा पोलीस लाभार्थी दिसला.