मिरज : मिरज ते पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथील दरोडाप्रकरणी दोघांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकू लावून १२ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी मंगल तेरसिंग वसौया यांनी व ३२ हजारांचा मोबाईल काढून घेऊन सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी शिवराज महेश धरवल यांनी फिर्याद दिली आहे.
तानंग फाटा येथील एका सिमेंट खांब तयार करण्यांत येणाऱ्या कारखान्यात रविवारी पहाटे पाच जणांनी दरोडा टाकला. कडी काढून घरात प्रवेश करून बालकाच गळा चिरून टाकेन, अशी धमकी देत मजूर कुटुंबाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम धान्य कपडे चोरून नेल्याचे मंगल वसौया यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लघुशंकेसाठी थांबले असता तिघांनी झडप घालून मोबाईल काढून घेऊन बचावासाठी मोटारीत जावून बसले असता पहारीने हल्ला करून मोटारीच्या काचा फोडल्याचे शिवराज धरवल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरोड्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.