पृथ्वीराज उर्फ किशोर बाजीराव पाटील (वय ३०), रितेश राजू थोरात (१९, दोघेही रा. नागराळे, ता. पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता धनाजी भीमराव कोळी (रा. कुंडल) यांचा तडसर येथील शिवारात खून झाला. ही माहिती बुधवारी सकाळी समजली. याबाबत चिंचणी वांगी पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
कोळी मूळचे जत येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून ते बलवडी फाटा येथे वास्तव्यास आहेत. मागील दोन महिन्यांपासून ते कुंडल येथील शेतकऱ्याच्या तडसर येथील शिवारातील शेतात शेतमजुरीसाठी येत होते. पृथ्वीराज उर्फ किशोर पाटील यांचे ८० हजार रुपये कोळी यांनी घेतले होते. हे पैसे परत मागितले असता कोळी देत नव्हते. यावरून दीड महिन्यापूर्वी जोरदार भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून पृथ्वीराज व रितेश यांनी तडसर शिवारातील शेतात मोटरसायकलच्या शॉक ॲब्सॉर्बरने धनाजीच्या कानामागे व कपाळावर गंभीर वार करून खून केला. या वेळी अन्य दोघांनीही साथ दिली होती.
उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, उपनिरीक्षक महादेव शिंदे, अधिकराव वनवे, अशोक परीट, गणेश तांदळे, विशाल साळुंखे, सतीश मोहिते, पवन जाधव, अजय धोत्रे, राहुल कुंभार, योगेश माळी, जगदीश मोहिते यांच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले असता ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
फोटो ओळ :
तडसर खूनप्रकरणी अटक केलेले दोन आरोपी व चिंचणी वांगी पोलिसांचे पथक.