सांगली : आगामी विधानसभा निवडणुका आघाडीमार्फतच लढविल्या जाणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकसंध लढले तरच, राज्यात आघाडीची सत्ता येईल. एकमेकांच्या खोड्या काढत बसले तर ते मरतील, असे मत वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वबळावर लढण्याचे मत कोणीही व्यक्त करू नये. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्याबाबत तर्कवितर्क करणे चुकीचे आहे. राज्यात कॉँग्रेसची चांगली परिस्थिती आहे. जिल्ह्यातील कोणताही नेता भाजप, शिवसेनेत जाणार नाही. सर्वांशीच माझी चर्चा झाली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची केवळ हवा आहे. नारायण राणे माझे मित्र असल्याने त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. ते पक्ष सोडणार नाहीत. राज्यात नेतृत्व बदलाच्या चुकीच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मंत्रिमंडळात नाराजी असण्याचे कारणच नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यात आघाडीचे सरकार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन चालावे लागते. तडजोड करावी लागते. अशावेळी सर्वांचीच सर्व कामे होतील, असे नाही. आगामी विधानसभा निवडणुका लढविताना आघाडीमध्ये काही ठिकाणी जागांची अदलाबदल शक्य आहे, पण फार मोठे बदल होणार नाहीत. काही अपक्ष आमदार राष्ट्रवादीजवळ असल्याने त्यांच्या कोट्यातूनच उमेदवारी (पान ७)
खोड्या केल्या तर दोघेही मरतील!
By admin | Published: July 19, 2014 11:42 PM