शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अंध मुलांना ब्रेल लिपीतून शिवरायांचे दर्शन : शिक्षिकेने केले ब्रेलमधील पुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:25 AM

सांगली : शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांचे अद्भूत दुर्गवैभव या सर्व गोष्टींच्या अभ्यासाची चव अंध विद्यार्थ्यांनाही चाखता यावी, या दृष्टीने मिरजेतील सुशीलाबाई घोडावत अंध शाळेने चक्क बे्रल लिपीतील पुस्तक साकारले. इतकेच नव्हे, तर अंध विद्यार्थी आता याच पुस्तकाच्या माध्यमातून शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास मांडताना दिसत आहेत.नॅब संचलित सुशीलाबाई घोडावत अंध शाळेत हा ...

ठळक मुद्देया पुस्तकात शिवनेरी ते रायगड अशा ३० निवडक आणि महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती मिरजेतील सुशीलाबाई घोडावत अंध शाळेने चक्क बे्रल लिपीतील पुस्तक साकारले

सांगली : शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांचे अद्भूत दुर्गवैभव या सर्व गोष्टींच्या अभ्यासाची चव अंध विद्यार्थ्यांनाही चाखता यावी, या दृष्टीने मिरजेतील सुशीलाबाई घोडावत अंध शाळेने चक्क बे्रल लिपीतील पुस्तक साकारले. इतकेच नव्हे, तर अंध विद्यार्थी आता याच पुस्तकाच्या माध्यमातून शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास मांडताना दिसत आहेत.

नॅब संचलित सुशीलाबाई घोडावत अंध शाळेत हा उपक्रम आकाराला आला. दुर्ग अभ्यासक प्रवीण भोसले यांनी लिहिलेले ‘शिवदुर्ग यात्रा’ हे किल्ल्यांच्या माहितीचे पुस्तक ब्रेल लिपीत लिप्यंत्तर करण्याचे ठरविले. शाळेतील ब्रेल लिपी शिक्षिका उज्ज्वला हिरेकुडी यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय लेले, मुख्याध्यापक जी. व्ही. कुचेकर, सह शिक्षिका अनिता गायकवाड, अर्चना बारसे यांच्या सहकार्याने ब्रेल लिपीतील पुस्तक परिश्रमपूर्वक तयार केले. या पुस्तकात शिवनेरी ते रायगड अशा ३० निवडक आणि महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती आहे. ब्रेल लिपीतील या पुस्तकामुळे अंध विद्यार्थांना दुर्ग भटकंतीची अनुभूती मिळणार आहे.

शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असणाºया या गडकोटांची माहिती अंध विद्यार्थांना होत आहे. महाराष्ट्राला गडकोटांची मोठी परंपरा आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शेकडो किल्ले आहेत. याची माहिती या पुस्तकात आहे.या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विजय लेले, सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे, चिंतामणी पटवर्धन, प्रा. प्रकाश कुलकर्णी, सुधीर नाईक, आनंद लेले, अर्चना लेले यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक जी. व्ही. कुचेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिता गायकवाड यांनी, तर आभार अर्चना बारसे यांनी मानले.अभिनव संकल्पनाशिवरायांच्या जीवनचरित्रातील अनेक महत्त्वाचे प्रसंग, लढाया या किल्ल्यांच्या साक्षीनेच झाल्या आहेत. छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या या किल्ल्यांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली. मात्र, ती सारी डोळस व्यक्तींसाठी होती. अंध मुलांना या गडकोटांची माहिती मिळावी, यासाठी घोडावत अंध शाळेने अभिनव उपक्रम हाती घेतला.