शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिल्ह्यातील साहित्यिकांचे ब्रॅँडिंग करणार

By admin | Published: February 07, 2017 11:17 PM

शेखर गायकवाड : सांगलीत विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ महोत्सवास प्रारंभ

सांगली : जिल्ह्यात नामांकित साहित्यिकांची मोठी फळी असूनही प्रसिध्दीपासून दूर असल्यामुळे त्यांची जगाला ओळख झाली नाही. त्यांची जगाला ओळख करून देण्यासाठी सांगली ब्रँडिंगच्या धर्तीवर प्रसिध्द साहित्यिकांचे ब्रॅडिंग करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि राजमती सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीतील नेमिनाथनगर येथील राजमती भवन येथे मंगळवारी विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी गायकवाड यांच्याहस्ते झाले. सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राजमती सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, नामदेव माळी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय गायकवाड, प्राचार्या मीनाक्षी वाजे उपस्थित होते.गायकवाड म्हणाले की, सांगली जिल्ह्याला ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, चारूता सागर यांच्यापासून ते तारा भवाळकर यांच्यापर्यंत फार मोठ्या साहित्यिकांचा इतिहास आहे. या साहित्यिकांच्या साहित्याची जगाला ओळख करून देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या सर्वच साहित्यिकांची जगाला परिचय करून देण्यासाठी त्यांचेही ब्रॅँडिंग करणार आहे. त्यादृष्टीने आमचे कामही सुरू आहे. या साहित्यिकांची सध्या तरुण पिढीलाही ओळख होण्याची गरज आहे. आजच्या तरुणांमध्ये वाचन कमी होत चालले असून, ही चिंतेची बाब आहे. याचा शिक्षक व पालकांसह सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी वाचन संस्कृती रुजविल्यास निश्चित भविष्यातील तरुण पिढी सक्षम होण्यास मदत होईल.डॉ. भवाळकर म्हणाल्या की, मुलांना प्रश्न आणि उत्तर याच्यातून शिक्षकांनी बाहेर काढले पाहिजे. उत्तर तर त्यांना सांगूच नका. प्रश्न आणि उत्तरातून विद्यार्थ्यांना पदव्या मिळतील; पण त्यांच्या आयुष्यात ते सक्षमपणे उभे राहू शकणार नाहीत. जगाच्या पाठीवर विद्यार्थ्यांना सक्षम उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची गरज आहे.प्रा. महाजन म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके वाचण्याची गोडीही शिक्षकांनी लावली पाहिजे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी प्रास्ताविक केले. कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी आभार मानले. डॉ. शोभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)