संख : दरीबडची (ता.जत) येथील तलाठी विलास भरमन्ना चव्हाण (वय ४८) इकराराची नोंद घेवून इकरार देण्याकरीता ५०० रूपयाची लाच स्विकारताना लााचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दाखल झाली होती. ही घटना तलाठी काार्यलयात दुपारी १ वाजता घडली. पूर्व भागातील दरीबडची व लमाणतांडा या गावी हे तलाठी तीन वर्षापासून कार्यरत आहे. दरीबडची गावातील शेतकरी श्रीशैल भीमराव पाटील नामक या व्यक्तीने सातबारा इकरार बोजा नोंदीसाठी अर्ज केला होता .तलाठी चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चअंती ५०० रूपये लाचेची मागणी केली.रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.लाच रक्कम घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.तलाटी चव्हाण यांचे विरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे.
पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अपर पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक सुहास नाहगेड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अन्टी करप्शन ब्युरो सागली सुजय घाटगे,पोलीस निरीक्षक प्रशांत चोगुले, तसेच पोलीस अंमलदार फौजदार रविंद्र धुमाळ,पो.हे.सालीम मकानदार, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, पो.गा. प्रितम चौगुले, धनंजय खाडे, पो.कॉ. सुहेल मुल्ला यांनी केली आहे.