गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत बनले असताना, शासकीय कर्मचाऱ्यांकडून जादाच्या कमाईसाठी सर्वसामान्यांची अडवणूक सुरूच आहे. लाचेची मागणी करताना आता थेट कर्मचारी न करता, खासगी व्यक्तीला पुढे करून लाच मागण्याचेही प्रकार वाढले आहेत.
चौकट -
वसुलीत महसूलच पुढे
* लाचखोरीच्या प्रकरणामध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचाच सहभाग अधिक आढळून येत आहे.
* अलीकडे जिल्ह्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची लाचेसाठी अडवणूक सुरू आहे.
* कोरोना कालावधीतही जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण कायम असून, तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे.
चौकट-
पाचशेपासून लाखापर्यंत लाच
लाचप्रकरणातील उदाहरणांमध्ये वीज बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडू नये यासाठी लाचेची मागणी करण्यात आली.
---
अजून एका प्रकरणात लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठीही लाचेची मागणी करण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यात घडला.
कोट -
शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी विभागाशी संपर्क साधावा. तक्रारीची शहानिशा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
सुजय घाटगे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
चौकट
२०१७ २०
२०१८ २२
२०१९ २२
२०२० २२
२०२१ ११