मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गावर हा पूल असून, बांधकाम १९७४ मध्ये २२ लाख ४२ हजार रुपये खर्चून करण्यात आले होते. त्यावेळी या पुलावरून वाहतूक फार कमी प्रमाणात होती. सध्या या पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ऊस वाहतुकीबरोबर अवजड वाहतूकही या पुलावरून होत असल्याने धोका निर्माण होत आहे.
मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील माणगंगा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने येथील र स्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मात्र नदीवरील पूल अरुंद आहे.
दिघंची हे गाव सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. दिघंचीपासून अवघ्या बारा किमी अंतरावर राजेवाडी साखर कारखाना असल्याने बऱ्याच प्रमाणात ऊस वाहतूकही या पुलावरून होत आहे. यामुळे पर्यायी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
कोट
माणगंगा नदीवरील पूल अरुंद झाला आहे, पुलाची दुरवस्था झाली आहे, कठडे तुटले आहेत. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे व पर्यायी पूल बांधण्यात यावा, यासाठी आमदार अनिल बाबर आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. - अमोल मोरे, सरपंच, दिघंची
फोटो-२८दिघंची१
फोटो ओळी : दिघंची येथील माणगंगा नदीवरील धोकादायक स्थितीत व अरुंद असलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे.