शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

गोंधळेवाडीत सख्ख्या भावाचा खून

By admin | Published: August 03, 2016 12:27 AM

चाकूने हल्ला : कौटुंबिक वादातून कृत्य; संशयित पसार

सांगली/उमदी : कौटुंबिक वादातून अत्तू परतू वालेकर (वय ४५) याचा त्याच्या सख्ख्या भावानेच चाकूने हल्ला करून खून केला. गोंधळेवाडी (ता. जत) येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर सुरेश परतू वालेकर हा पसार झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अत्तू वालेकर व संशयित सुरेश वालेकर हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू आहे. या वादातून अनेकदा त्यांच्यात कडाक्याचे भांडणही झाले होते. नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तरीही त्यांच्यात धुसफूस सुरूच होती. मंगळवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर संशयित सुरेश दारू पिण्यास गेला होता. सायंकाळ झाली तरी तो घरी परतला नव्हता. अत्तू वालेकर हे बाजारात गेले होते. ते घरी परतत असताना सुरेशने त्यांना अडविले व घराच्या विषयावरून वाद उकरुन काढला. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. सुरेशने खिशातील चाकू काढून अत्तू यांच्यावर सात ते आठ वार केले. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी नेताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. (प्रतिनिधी/वार्ताहर) पोलिसांचा छापा या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली; पण संशयित सुरेश पसार झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. सुरेशच्या शोधासाठी त्याच्या घरावर छापा टाकला, पण घरीही तो आला नव्हता.