मृत तरुणाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. अमली पदार्थांचा व्यसनी असलेला गोविंदा आईसोबत समतानगर येथे वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री तीन वाजता समतानगर येथे जुन्या हरिपूर रस्त्यावर दोन ते तीन हल्लेखोरांनी निर्घृणपणे गोविंदाचा खून केला. धारदार हत्याराने त्याचा गळा चिरून, डोक्यात दगड घातल्याचे घटनास्थळी दिसून आले.
घटनास्थळी गांधी चाैक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. खुनाचे कारण समजू शकले नाही. रात्री गोविंदा याच्यासोबत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनी मित्रांच्या भांडणातून हा खून करण्यात आल्याचा संशय आहे.
मिरजेतील समतानगर, माणिकनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ होत असून दोन दिवसांपूर्वी येथे गुन्हेगारांच्या टोळक्याने खंडणीसाठी समीर शेख या तरुणावर कोयत्याने हल्ला केला हाेता.
फाेटाे : ०६ गाेविंदा मुत्तीकाेळ