सांगली : भारत दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी गुरुवारी निदर्शने केली. १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत लक्षवेधी सप्ताह पाळण्यात येत आहे.याअंतर्गत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत. अनुसुचित जातीमधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले पाहीजेत यासाठी निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सर्व संघटनांनी भाग घेतला. अधिकाऱ्यांच्या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. तिसऱ्या वेतन करारासाठी आर्थिक तरतुदीत आवश्यक बदल करा, नवी कालबद्ध पदोन्नती लागू करा, पदसंख्येचा फेरआढावा घ्या आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अस्लम पटेल, सचिव रविकिरण माने, खजिनदार दिगंबर मंडलीक, मानसिंग पाटील, सेवानिवृत्त संघटनेतर्फे सुनील नानिवडेकर, सुरेंद्र सूर्यवंशी, विकास भेदे, राजेंद्र पाटील, प्रदीप कोळी, अभय जोशी, राजेंद्रकुमार वायचळ, पोपट हवालदार, विकास चव्हाण, नेताजी साळुंखे, विनोद मोरे आदींनी केले.
सांगलीत बीएसएनएल कर्मचाऱ्यांची तिसऱ्या वेतन करारासाठी निदर्शने
By संतोष भिसे | Published: February 15, 2024 5:46 PM