शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

अपघातात बुधगावचे दाम्पत्य ठार

By admin | Published: May 30, 2017 12:08 AM

अपघातात बुधगावचे दाम्पत्य ठार

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टा : आष्टा-सांगली रस्त्यावर मिरजवाडीनजीक सनी पेट्रोलपंपासमोर सोमवारी सकाळी साडेनऊ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार झाले. जोसेफ विष्णू आवळे (वय ४६, रा. बुधगाव, ता. मिरज) व कविता जोसेफ आवळे (४०) अशी त्यांची नावे आहेत. कविता यांच्या वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी ते नैवेद्य घेऊन जात असताना हा अपघात झाला. यात त्यांचा मुलगा सार्थक (१०) गंभीर जखमी झाला आहे. बुधगाव येथील जोसेफ व कविता आवळे दाम्पत्यापैकी कविता यांचे माहेर आष्टा आहे. त्यांचे वडील नागनाथ पांडुरंग अवघडे (रा. अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाजवळ, जयंत बेघर वसाहत) यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी त्यांचा दहाव्याचा विधी होता. त्यासाठी सकाळी नैवेद्य घेऊन जोसेफ, कविता व त्यांचा मुलगा सार्थक दुचाकीवरून (एमएच १० एयू २०२६) आष्ट्यास येत होते. मिरजवाडीनजीक सनी पेट्रोलपंपासमोर समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. तिघेही दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. जोसेफ व कविता यांच्या डोक्यास गंभीर मार लागला, तर सार्थक यास हातास दुखापत झाली. अपघातानंतर तातडीने जोसेफ यांना मिरज शासकीय रुग्णालयात, तर कविता यांना आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. सार्थकवर आष्टा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जोसेफ यांच्या मृतदेहाचे विच्छेदन मिरजेत, तर कविता यांच्या मृतदेहाचे विच्छेदन आष्टा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. आष्टा पोलिसात अपघाताची नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक जहॉँगीर शेख अधिक तपास करीत आहेत. नातेवाईकांचा आक्रोशकविता व जोसेफ आवळे यांना सार्थक व सहारा (८) अशी दोन अपत्ये आहेत. वडिलांच्या कार्यविधीसाठी नैवेद्य घेऊन येत असताना कविता यांचा पती जोसेफसह मृत्यू झाल्याची बातमी आष्टा परिसरात समजताच परिसर शोकमग्न झाला. दुपारी चार वाजता कविता यांचा मृतदेह माहेरी आणल्यानंतर आई, भाऊ, बहिणी व नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता.