येथे जुनी पाणी योजना कालबाह्य झाल्याने नवीन पाणी योजना मंजूर करण्यात आली. साडेचार कोटींची ही योजना पूर्ण झाली आहे; मात्र वीज पुरवठा जोडणी अभावी योजना रखडली होती. पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील व ग्रामस्थांनी वीजपुरवठा जोडून योजना तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
महावितरणने सात गावच्या कालबाह्य योजनेची थकबाकी भरल्यानंतर वीजपुरवठा जोडण्याची भूमिका घेतली होती. पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हा विषय खा. संजयकाका पाटील व आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडे मांडला. कालबाह्य योजनेच्या थकबाकीचा विषय एका गावचा नाही तो सात गावचा असल्याने वीज महावितरणच्या अडवणुकीच्या धोरणाबाबत तक्रार केली. याची दखल घेत खा. पाटील, आ.गाडगीळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढल्याने महावितरणने वीज पुरवठा जोडला. अखेर नवीन पाणी योजना कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे.
चौकट
बुधगावच्या पाणी योजनेचे काम तीन वर्षांनंतर पूर्ण झाले. कालबाह्य योजनेच्या थकीत बिलासाठी वीजपुरवठा जोडला जात नव्हता. यासाठी आपण व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी खा. संजयकाका पाटील व आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडे तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार तोडगा काढण्यात आला.
- विक्रम पाटील
पं. स. सदस्य बुधगाव