शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा उद्योग उभारा: नानासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:23 PM

सांगली : तरुणांना आपल्या आयुष्यात अनेक संधी उपलब्ध होत असतात. उमेदीच्या वयात कोणत्या तरी राजकीय नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा, ती ...

सांगली : तरुणांना आपल्या आयुष्यात अनेक संधी उपलब्ध होत असतात. उमेदीच्या वयात कोणत्या तरी राजकीय नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा, ती शक्ती तरुणांनी उद्योगात लावावी. आलेल्या अनुभवाच्या जोरावर उद्योगात अग्रेसर रहावे. पाश्चिमात्य देशात उद्योग उभा करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देऊन उद्योगासाठी मार्गदर्शन केले जाते. त्याप्रमाणेच जागतिक बाजारपेठेचा विचार करून प्रशिक्षण घेऊन युवकांनी आत्मविश्वासाने उद्योगात संधी निर्माण करावी, असे आवाहन माजी सनदी अधिकारी नानासाहेब पाटील यांनी रविवारी सांगलीत केले.मराठा सेवा संघ संचलित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या केंद्रीय कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा सेवा संघाची राज्य कार्यकारिणी पदाधिकारी बैठक आणि जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम झाला.पाटील म्हणाले, आपल्या उद्योगात उतरणाºया तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळेच अनेक तरुणांना नवीन काही तरी करण्याची जिद्द असतानाही, त्यांची कुचंबणा होते. या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशात युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. आता उद्योग उभारणीतील ध्येय-धोरणे बदलत असल्याने तरुणांनी योग्य ते प्रशिक्षण घेऊनच उद्योगात उतरावे, जेणेकरून कसोटीच्या काळातही त्यावर मात करण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल.मराठा सेवा संघाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसºयादिवशी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा अहवाल सादर करत, येत्या तीन महिन्यात करावयाचे नियोजन करण्यात आले. प्रदेश कार्यकारिणीची पुढील बैठक अकोला येथे जुलै महिन्यात घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.यावेळी उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुधाकर पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शीतल मोरे, आशा पाटील, जयश्री घोरपडे, शाहीर पाटील यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.देशभरातील तरुणांना सांगलीतून मिळणार मार्गदर्शनमराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष विजयराव घोगरे, नानासाहेब पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन केले जाणार असून, त्यांना येणाºया अडचणींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. देशातील मराठा तरुणांना सांगलीतील या कार्यालयातून मार्गदर्शन केले जाणार आहे.