इस्लामपूर : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर घातलेल्या बंदीविरोधात पश्चिम महाराष्ट्रातील बळिराजा प्राणी बैलगाडी शर्यत बचाव संघटनेच्यावतीने कोरेगाव (जि. सातारा) येथे शनिवार, दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता भव्य संघर्ष मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास वाळवा व शिराळा तालुक्यातील बैलगाडी चालक, मालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे सदस्य प्रदीप बोडरे यांनी केले आहे.या मेळाव्यास केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, खासदार राजू शेट्टी, खासदार उदयनराजे भोसले, खा. शिवाजीराव आढळराव, सातारा जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील यात्रा, जत्रा उत्सवाच्या निमित्ताने होणारा पारंपरिक खेळ म्हणून ग्रामीण भागामध्ये बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जात असून त्यास शेकडो वर्षांची परंपरा आहे. (वार्ताहर)
बैलगाडी शर्यत बंदी
By admin | Published: July 10, 2014 12:35 AM