संजयनगर : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा सांगलीत निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कृषी विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये देशातल्या विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिल्लीतील आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने लाठीहल्ला केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे. संदीप राजोबा यांनी केला.
चाैकट
अन्यथा स्वाभिमानीही दिल्लीकडे कूच करणार...
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतीत सकारात्मक भूमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे दिल्लीकडे कूच करतील, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिला.
फोटो : ०२ डी ९
ओळ : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
छाया : सुरेंद्र दुपटे