शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

म्हैसाळ जवळ कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, पोलीस-शिवसैनिकांच्यात बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 2:22 PM

आंदोलन स्थळी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यांची दोन्ही राज्यांनी खबरदारी घेतली होती. आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी एकत्र येत फोटो काढला.

म्हैसाळ : कर्नाटकातछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाची विटंबना झाली. या घटनेनंतर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्हत आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक भाजप सरकारचा  निषेध करत कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख शंभुराजे काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस-शिवसैनिकांच्यात बाचाबाची झाली.महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जाऊन कर्नाटकच्या भाजप सरकारचा निषेध करण्याचे नियोजन पूर्व नियोजित होते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी कडक बंदोबस्त तैन्यात केला होता. सकाळी दहा वाजल्यापासून दोन्ही ही राज्याच्या पोलीस यंत्रणा तयारीत होत्या. आंदोलकानी आंदोलनाला सुरुवात करताना पोलीस व शिवसैनिकांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा दहन केला.यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! हा आवाज कोणाचा हा आवाज शिवसेनेचा या घोषणा देत परीसर दणाणून सोडला. आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी वाहतूक थोड्या काळासाठी थांबली होती. आंदोलन झाल्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.यावेळी सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभुराजे काटकर, महिला जिल्हा संघटक सुजाता इंगळे, मिरज तालुका शिवसेनेचे प्रमुख विशालसिंह रजपूत, मिरज विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तानाजी सातपुते, मिरज शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, गजानन मोरे, बाळासाहेब मगदूम, सतिश नलवडे, बाळासाहेब मगदूम, प्रदिप जाधव, बबन कोळी, यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर शिवसेनेच्या वतीने आंदोलन होणार असल्याने महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी यंत्रणा सज्ज ठेवते. आंदोलन स्थळी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यांची खबरदारी घेतली होती. आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी एकत्र येत फोटो काढला.

वाहतूक ठप्प महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्नाटक पोलीसांनी कर्नाटकातील वाहतूक तर महाराष्ट्र पोलीसांनी महाराष्ट्रातील वाहतूक काही काळ थांबवली होती. यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजKarnatakकर्नाटकShiv Senaशिवसेना