शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
2
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
3
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
4
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
5
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
6
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
7
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
8
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
9
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
10
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
11
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
12
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
13
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
14
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...
15
क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत
16
Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
17
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
18
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
19
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
20
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन नोटीसचे दहन, सांगलीत निदर्शने; ..तर हातात बंदुका घेण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:15 IST

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादन हरकतीच्या नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधी कृती समितीतर्फे त्या नोटीसचे दहन ...

सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादन हरकतीच्या नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधी कृती समितीतर्फे त्या नोटीसचे दहन गुरुवारी सांगलीत करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात शंखध्वनी करण्यात आला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ, असा इशारा यावेळी समितीचे महेश खराडे यांनी दिला.सांगलीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात आंदोलन करण्यात आले. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘रद्द करा, रद्द करा शक्तिपीठ महामार्ग बंद करा’, ‘शेतकरीविरोधी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी महेश खराडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र, निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत महामार्ग करणारच, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आता माधवनगर, बुधगाव, कर्नाळ आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच आम्ही त्या नोटीसचे दहन केले. आम्ही केवळ नोटीस दहन करून थांबणार नाही. प्रसंगी हातात शस्त्र घेऊ, पण एक इंचही जमीन देणार नाही.

खराडे म्हणाले, महामार्ग हे विकासाचे मोठे साधन आहे. यात दुमत नाही, पण जे महामार्ग गरजेचे आहेत ते करावेत. त्याला आमचा विरोध नाही. शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी-विजापूर महामार्गाला समांतरच आहे. रत्नागिरी विजापूर रस्त्यावर पुरेशी वाहने नाहीत. आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही. मग हा महामार्ग कशासाठी?कोणत्याही भाविकांची यासाठी मागणी नाही. तरीही ठेकेदार आणि आमदार, खासदारांना पोसण्यासाठी हा महामार्ग होत आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे. याशिवाय यात भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आम्ही लढा चालू ठेवणार. यावेळी प्रवीण पाटील, उमेश एडके, रघुनाथ पाटील, भालचंद्र आंबोळे, राजेश एडके, राजेश पाटील, अधिक पाटील, विलास थोरात, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, श्रीकांत पाटील, अनिल कोकाटे, मयूर पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गagitationआंदोलनShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग