खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील बसस्थानक एसटी विना खाजगी वाहनाचे वाहनतळ बनले आहे. याकडे एसटी व्यवस्थापनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
दीड वर्षापूर्वीच या बसस्थानकाचे सुशोभीकरणाचे काम झाले होते. याठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. एक खिडकी कार्यालय चालू करून विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक पासची व्यवस्था. रंग रंगोटी, स्वच्छता, वृक्षारोपण सीसीटीव्ही कॅमेरे अशी व्यवस्था करून बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलला होता; परंतु लॉक डाऊनकाळामध्ये येथील सर्व व्यवस्था कोलमडले आहे. एसटीच्या बस फेऱ्या कमी केल्या प्रवासी व भाविकांचे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
याचा फायदा घेत एसटी स्थानक खाजगी वाहनधारकांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी चारचाकी गाड्यांचे पार्किंग केले जाते. यामुळे बसस्थानकाचे रूपांतर खाजगी पार्किंगमध्ये झाल्याचे चित्र आहे. कोणीही लक्ष द्यायला नसल्याने अवैध प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे.
प्रसिद्ध देवस्थान ठिकाणच्या एसटी बसस्थानकाकडे एसटी प्रशासन आणि व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने भाविक आणि ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी, पोलीस आणि एसटी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करून प्रसिद्ध देवस्थान ठिकाणच्या बसस्थानकाची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो-१५खरसुंडी१ व २