लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना संकटाचा सामना करीत कर्मवीर पतसंस्थेने नऊ हजार कोटींचा व्यवसाय करून नफ्याची परंपरा कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले.
कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील होते. ते म्हणाले, २०१९-२० चा लाभांश सभासदांना देणारी ही सर्वांत पहिली संस्था आहे. ठेवी ५३९ कोटी, कर्जे ३९८ कोटी, भागभांडवल २१९ कोटी ५५ लाख, स्वनिधी ४८ कोटी, खेळते भांडवल ६९१० कोटी आहे. विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांनी केले. सभासद नंदकुमार साळुंखे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
बी. डी. वांगीकर, उपाध्यक्षा भारती चोपडे, ॲड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू, लालासाहेब थोटे, ए. के. चौगुले आदी उपस्थित होते. वसंतराव नवले यांनी आभार मानले.