शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

मराठा मोर्चाची उद्या जिल्हा ‘बंद’ची हाक

By admin | Published: January 09, 2017 12:06 AM

माळवाडीतील मुलीचा खून : सांगलीत आज कॅँडल मार्च; संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी

सांगली : माळवाडी (ता. पलूस) येथील १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्या संशयितांना तातडीने अटक करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी १० जानेवारीला जिल्हा ‘बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवारी सांगलीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. याचदिवशी सायंकाळी स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून कॅँडल मार्च काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, विलास देसाई, श्रीकांत शिंदे, श्रीरंग पाटील, आशा पाटील, कविता बोंद्रे, उषा पाटील, रेवती पाटील, अमृता बोंद्रे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संजय पाटील म्हणाले, माळवाडीतील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मराठा क्रांती मोर्चा या घटनेचा निषेध करीत आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माळवाडीला धाव घेतली होती. शासकीय रुग्णालयात मुलीचा मृतदेह विच्छेदन तपासणीला आणल्यानंतरही महिला पदाधिकारी तेथे गेल्या होत्या. या गुन्ह्यातील संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा, या मागणीसाठी १० जानेवारीला जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे. ते म्हणाले, कोपर्डी प्रकरणाची आपल्या जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली आहे. अशा घटना यापुढे घडू नये, यासाठी पोलिसांनी योग्यप्रकारे तपास करावा. संशयितांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी साक्षीदार व पुरावे गोळा करावेत. मंगळवारचा ‘बंद’ शांततेत पार पाडला जाईल. सकाळी अकरा वाजता सर्व पदाधिकारी शहरात फेरी काढून सर्वांना ‘बंद’चे आवाहन करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना पाच महिला पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ निवेदन देणार आहे. ‘बंद’मध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहा वाजता स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून कॅँडल मार्च काढला जाणार आहे. राजवाडा चौक, महापालिकेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कँडल मार्चची सांगता केली जाणार आहे. (प्रतिनिधी)घटनेचा निषेध : तासगावात कडकडीत बंदतासगाव : पलूस तालुक्यातील माळवाडी येथील घटनेबद्दल जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी तसेच घटनेचा निषेध म्हणून शेतकरी कामगार पक्ष, शिवप्रतिष्ठानच्यावतीने रविवारी तासगाव बंद पुकारला होता. नागरिकांनीही या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. माळवाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा प्रवृत्तींना कुठेही पोलिस प्रशासनाची जरब दिसून येत नाही. तरी हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवावा, शासनाने या मुलीच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी, अशा प्रकरणांवर कडक शिक्षेची तरतूद करावी यांसह विविध मागण्या करीत तासगाव बंदची हाक देण्यात आली होती. व्यापाऱ्यांसह, नागरिकांनी बंदला पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवले. त्यामुळे तासगावच्या बाजारपेठांत शुकशुकाट होता. तसेच तालुक्यातील मणेराजुरी आणि बस्तवडेसह काही ठिकाणीही बंद पाळून माळवाडीतील घटनेचा निषेध करण्यात आला. पदाधिकाऱ्यांची आज बैठकडॉ. संजय पाटील म्हणाले, मंगळवारच्या ‘बंद’चे जिल्ह्यातील नियोजन करण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता संघटनेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमंत्रित केले आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये यांनाही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल. माळवाडीचा खटला जलदगती न्यायालयात चालविला माळवाडी (ता. पलूस) येथे १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा अमानुषपणे खून केल्याची घटना गंभीर व निंदनीय आहे. संशयितांना पोलिस लवकरच अटक करतील. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल व याचा वर्षभरात निकाल लागेल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. रहाटकर म्हणाल्या की, माळवाडीत दोन दिवसांपूर्वी मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या घटनेची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. माळवाडीत रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. पीडित मुलीच्या नातेवाईकांची तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांनी माहिती घेतली. पोलिसांचा तपास योग्यप्रकारे सुरु आहे. काही संशयित ताब्यात आहेत. पण अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. संशयितांकडे चौकशी केली जात आहे. संशयितांचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पालकांना चिंता वाटावी अशीच ही घटना घडली आहे. पोलिस मुळापर्यंत जाऊन तपास करुन याचा निश्चितपणे छडा लावतील. सर्व मुद्यांना धरुन तपास सुरु आहे. राज्यात अशाप्रकरच्या घटना वाढत असल्याने, ही एक चिंतेची बाब बनली आहे. अशा गुन्ह्यातील संशयितांना कडक शासन झाले, तरच कायदा काय असतो, हे त्यांना समजेल. त्यामुळे भविष्यात असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही. रहाटकर म्हणाल्या की, काही समाजकंटक सोशल मीडियावरुन अफवा पसरवत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. पोलिस अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेत आहेत. भिलवडी पोलिस ठाण्यात मुलीचा खून, बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासाचा आढावा घेतला जाईल. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)