महापालिका अधिनियमानुसार दोन वर्षांत सलग चार क्षेत्र सभा घेणे बंधनकारक असताना, कोणत्याही नगरसेवकांनी क्षेत्र सभा घेतल्या नसल्याची माहिती महापालिका प्रशासनानेच माहिती अधिकारानुसार दिली आहे. त्यामुळे सांगली मिरज कुपवाड शहरातील सर्व ७६ नगरसेवकांची पदे रद्द करुन कर्तव्यात कसूर करणाऱ्या सहायक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे दि. १९ मार्च रोजी समितीने निवेदनाद्वारे केली होती. मात्र, याची दखल घेण्यात आली नसल्याने जिल्हा संघर्ष समितीने महापालिका आयुक्त व सर्व नगरसेवकांना दावापूर्व नोटीस दिली आहे. आयुक्त व नगरसेवकांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित नगरसेवकांची पदे रद्द होईपर्यंत, त्यांना कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही रुईकर यांनी सांगितले.
क्षेत्रसभा न घेणाऱ्या सर्व नगरसेवकांचे पद रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:25 AM