शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

Sangli: खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 6:37 PM

दिलीप मोहिते विटा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली ११ उमेदवारांची यादी ...

दिलीप मोहिते

विटा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली ११ उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी जाहीर केली. यात खानापूरविधानसभा मतदारसंघातून नागेवाडी (ता.खानापूर) येथील ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव संग्राम कृष्णा माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीतून शिवसेनेचे सुहास बाबर, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजितदादा गटाचे अ‍ॅड. वैभव पाटील, भाजपचे ब्रम्हानंद पडळकर तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे.महायुतीतच इच्छुक उमेदवारांची रेलचेल झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत असतानाच विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही ठरलेले नाहीत. परंतु, आता वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या ११ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली.या यादीत ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव व ओबीसी समाजासाठी सातत्याने लढा देणारे नागेवाडी येथील संग्राम माने यांना डॉ. आंबेडकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. संग्राम माने हे ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांनी नागेवाडी पंचायत समिती गणातून खानापूर पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. या पंचायत समितीच्या निवडणूकीत दिवंगत माजी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या गटाचे उमेदवार बाळासाहेब नलवडे यांनी माने यांचा पराभव केला होता.त्यानंतर त्यांनी ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र लढा दिला होता. माने यांनी समाजाचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. फेबु्रवारीमध्ये त्यांनी पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सामाजिक कार्याची माहिती देत खानापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली. 

टॅग्स :Sangliसांगलीkhanapur-acखानापूरvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीElectionनिवडणूक 2024