शिराळा : शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला. गुरुवार दि. ४ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान अपघात घडला. या घटनेमुळे शिराळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत माहिती अशी की , गेल्या चार वर्षांपासून सिकंदर पन्हाळकर यांना ब्रेन हँमरेज हा आजार होता. त्यामुळे त्याना उपचारासाठी आंध्रप्रदेश मधील गंदवाल- रायचूर येथे नेत असत. बुधवार दि.३ रोजी रात्री ९ च्या दरम्यान स्वतःची तवेरा गाडी( क्रमांक एम एच ०४ सि बी ७१४७) मधून चालक अस्लम इब्राहिम नदाफ (वय ३६) यांचेसह सिकंदर पन्हाळकर, त्यांची दोन मुले दस्तगिर पन्हाळकर व अबू बक्कर पन्हाळकर (वय ४२) , नातू इक्लास अबूबक्कर पन्हाळकर ( वय १८ ) असे पाच जण गंदवाल येथे उपचारासाठी निघाले होते.बागलकोट पासून १५ किमी अंतरावरील शिरूर गावाजवळ गाडीचे पुढील दोन्ही टायर अचानक फुटल्याने गाडी उलटी झाली. यामुळे सिकंदर पन्हाळकर , दस्तगिर पन्हाळकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अस्लम नदाफ, अबू बक्कर पन्हाळकर , इक्लास पन्हाळकर हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच शिराळा येथून नातेवाईक व मित्रमंडळी यांनी बागलकोट शिरूर घटनास्थळी धाव घेतली.पन्हाळकर यांचा फर्निचर विक्रीचे शिराळा येथे दुकान आहे.
रस्त्यातच जेवणपन्हाळकर कुटुंबीय रात्री ९ च्या दरम्यान घरातून जेवणाचे डबे घेऊन बाहेर पडले. त्यानी रस्त्यातच जेवण केले.