गव्हाण : अंजनी (ता. तासगाव) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सरपंच स्वाती पाटील यांच्याहस्ते काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याचदिवशी १९२ लोकांचे लसीकरण करण्यात आले.
यापूर्वी अंजनी येथील नागरिकांना सावळज प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तासगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी जावे लागत होते. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करून जाणे त्रासदायक ठरत होते. परंतु आता गावातच आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू झाल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. समुदाय वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील, आरोग्यसेविका परविन तांबोळी, आरोग्यसेवक एस. एस. स्वामी, स्मिता सोरटे, संगीता माने, नाजनीन मुलाणी यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला. वैद्यकीय अधिकारी प्रमोद भोसले यांनी या लसीकरण मोहिमेस भेट दिली.
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच स्वाती पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच संजय सावळे, जयसिंग पाटील, मनीषा गुरव उपस्थित होते.
फोटो : २१ गव्हाण १
ओळ : अंजनी (ता. तासगाव) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय सावळे, जयसिंग पाटील, परविन तांबोळी यांच्या उपस्थितीत काेराेना लसीकरणाचा प्रारंभ झाला.