सांगली : जिल्ह्यात बुधवारी २३ जणांना कोरोनाचे निदान झाले. बाधितांची संख्या मर्यादित असल्याने दिलासा मिळत असून उपचार घेत असलेल्या महापालिका क्षेत्रातील रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने कोरोनाचा उतार कायम आहे. बुधवारी दिवसभरात महापालिका क्षेत्रात सांगली व मिरजेत प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, पलूस, शिराळा आणि वाळवा तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झालेली नाही.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल १९१ रुग्णांपैकी ४६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३८ जण ऑक्सिजनवर, तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आराेग्य विभागाच्यावतीने दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत ३२७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९९८ चाचण्यांंमधून ८ जणांना कोराेनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यतचे एकूण बाधित ४७५८१
उपचार घेत असलेले १९१
कोरोनामुक्त झालेले ४५६५८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३२
बुधवारी दिवसभरात...
सांगली ४
मिरज १
मिरज, खानापूर आटपाडी प्रत्येकी ४
जत ३
कडेगाव २
तासगाव १