शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

कार्वेच्या शाळेत पोषण आहारच मिळाला नाही!

By admin | Published: January 08, 2015 11:12 PM

विद्यार्थ्यांना राहावे लागले अर्धपोटी : कारवाईची मागणी

ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज, गुरुवारी पोषण आहार तयार केला नाही. अचानकपणे पोषण आहार रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारी अर्धपोटी राहावे लागले. ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत असून येथे १८८ मुलांसाठी आहार बनविला जातो. येथील शाळेत पोषण आहार तयार करण्याचा ठेका गावातील शिवतेज महिला मंडळाकडे आहे. मंडळाच्यावतीने एक महिला दररोज स्वयंपाक करुन देते. आज अचानक ही महिला शाळेत आली नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांची भंबेरी उडाली. ऐनवेळी आचारी न मिळाल्यामुळे पोषण आहारच तयार करण्यात आला नाही. दररोज शाळेत पोषण आहार मिळत असल्यामुळे बहुतेक सर्व विद्यार्थी जेवणाचा डबा घेऊन येत नाहीत. पण आहार न केल्यामुळे आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी जेवणासाठी सोडले. मात्र अनेक विद्यार्थ्यांना घरी जाऊनही जेवण मिळू शकले नाही. कारण बहुतेक पालक घरास कुलूप लावून शेतात गेले होते. शिवाय रोज मुले घरी जेवणास येत नसल्यामुळे अनेकांनी घरी दुपारचे जेवण शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे या मुलांना अर्धपोटीच राहावे लागले. शाळा गावापासून लांब आहे. त्यामुळे लहान मुलांना नाहक त्रास सोसावा लागला. या घटनेमुळे पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)