शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
2
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
3
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
4
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
5
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
6
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
7
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
8
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
9
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
10
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
11
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
12
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
13
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
14
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
15
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
16
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
17
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
18
मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा
19
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
20
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित

एक कोटीच्या अपहारप्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 1:57 PM

तासगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव, मार्केट यार्ड तासगाव, हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या पाच शाखांत तब्बल ...

तासगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव, मार्केट यार्ड तासगाव, हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या पाच शाखांत तब्बल एक कोटी ६२ लाख ६७ हजार ८३५ रुपयांचा अपहार झाल्याबाबत, जिल्हा बँकेच्या वतीने संबंधित नऊ कर्मचाऱ्यांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.जिल्हा बँकेच्या निमणी शाखेत व्याज आणि शासकीय अनुदान खात्यातील ८ लाख ३२ हजार ९०० रुपये शाखेतील कर्मचारी प्रमोद सुरेश कुंभार (रा. सांगलीवाडी) आणि शाखाधिकारी विजय तुकाराम यादव (रा. पलूस) या दोघांनी संगनमताने अपहार केला आहे. प्रमोद कुंभार याने वैयक्तिक ८ लाख १२ हजार ४०० रुपयांचा आणि शाखाधिकारी यादव यांच्या संगनमताने २० हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हबीब जहिरुद्दीन कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.सिद्धेवाडी शाखेत अविनाश दिलीप पाटील (रा. अंजनी), विनायक शंकर सूर्यवंशी (रा. नागेवाडी), सुरेश वसंतराव कोळी (रा. मांजर्डे) या तीन कर्मचाऱ्यांनी ४० लाख ८६ हजार ५६८ रुपयांची रक्कम शाखेतील सहा खातेधारकांच्या खात्यावर, परस्पर संमतीविना वर्ग करून अपहार केला आहे. याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखा आणि हातनूर शाखेतून कर्मचारी संजय कुमार पाटील (रा. शिरगाव) याने शासकीय अनुदानाची रक्कम सहा खातेदारांच्या वैयक्तिक खात्यावर परस्पर वर्ग करून ६४ लाख ५८ हजार ६८ रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.तासगाव शाखेत प्रमोद सुरेश कुंभार (रा. सांगलीवाडी), योगेश सुरेश वजरीणकर (रा. तासगाव), मारुती यशवंत हिले (रा. नांद्रे) या कर्मचाऱ्यांनी संगनमताने अवकाळी अनुदान, दुष्काळी निधी, संजय गांधी निराधार पेन्शन खाते, असे टप्प्याटप्प्याने एकूण ४८ लाख ९० हजार २९९ रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी हबीब जहिरुद्दीन कुलकर्णी यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.नेलकरंजी शाखेतील तीन कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखलआटपाडी : आटपाडी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत ४८ लाख ८८ हजार ३७८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राेखपालासह तीन कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे (रा. तळेवाडी), प्रदीप गुलाब पवार (करगणी) आणि दिगंबर पोपट शिंदे (नेलकरंजी), अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका विभागीय अधिकारी व वसुली अधिकारी हारुण रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी