शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

९० अंशाची चढाई, अनेक अडथळ्यांना पार करत इंद्रजितने केला कळकराय सुळका सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 5:53 PM

या सुळक्याची उंची २०० फुटांपर्यंत असून या ठिकाणी सकाळी प्रचंड वेगाने वारे वाहते. या वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १५० कि. मी इतका असतानादेखील या धाडसी तरुणांनी या सुळक्यावर यशस्वी चढाई केली.

उमेश जाधवकामेरी : सांगली जिल्ह्यातील अनेक तरुणांमध्ये साहसी पर्यटनाची ओढ वाढलेली आहे. असाच साहसी व अत्यंत कठीण श्रेणीत मोडणारा कर्जतमधील ढाक भैरी येथील गुहा आणि याच किल्ल्याजवळ असणारा कळकराय सुळका कामेरी (ता. वाळवा) येथील इंद्रजीत खंडागळे याने सर केला. या मोहिमेत त्याच्यासोबत त्याचे रत्नागिरी येथील मित्र अरविंद नवेले, धीरज पाटकर, आकाश नाईक, उमेश गोठीवरेकर व प्राची नाईक यांचा समावेश होता.या किल्ल्यावर कर्जत वरून सांडशी या गावातून जातात. अनेक डोंगर पार करत या ठिकाणी पोहोचायला पाच तास लागतात. या चमूने सकाळी नऊ वाजता या ट्रेकची सुरुवात केली. अवघड असे अनेक डोंगर कपाऱ्यांच्या अडथळ्यांना पार करत पाच तासांनंतर दुपारी २.३० वाजता या चमूला ढाकच्या पायथ्याशी पोहोचण्यात यश आले. या ढाकच्या गुहेमध्ये जाण्यासाठी सरसोट ९० अंशाची चढाई सुरू झाली. सर्व जण या गुहेत पोहोचल्यानंतर तिथे थोडावेळ थांबून पुन्हा त्याच मार्गाने खाली उतरण्याचा खतरनाक असा उलटा प्रवास करत पुन्हा या चमू ढाकच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत थांबला.याच ढाकच्या किल्ल्याच्या जवळच असलेला कळकराय सुळक्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता खंडागळे व त्याच्या सहकाऱ्यांनी चढाई (क्लाइंबिंग) करण्यास सुरुवात केली. या सुळक्याच्या माथ्यावर सकाळी ११ वाजता सर्वांनी पाय रोवला.प्रचंड वाऱ्यातही चढाईया सुळक्यावर पोहोचल्यावर थोड्याच वेळात सुळक्याच्या माथ्यावरून त्याच्या पायथ्याशी रॅपलिंग करत खाली आले आणि या तरुणांच्या धाडसी मोहिमेची सांगता झाली. या सुळक्याची उंची २०० फुटांपर्यंत असून या ठिकाणी सकाळी प्रचंड वेगाने वारे वाहते. या वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १५० कि. मी इतका असतानादेखील या धाडसी तरुणांनी या सुळक्यावर यशस्वी चढाई केली.

टॅग्स :Sangliसांगली