शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

सांगलीत आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:34 AM

सांगली : सांगलीचा ऐेतिहासिक वारसा ठरलेल्या आयर्विन पुलाने सोमवारी वयाची नव्वदी पूर्ण केली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवघ्या सांगलीकरांनी ...

सांगली : सांगलीचा ऐेतिहासिक वारसा ठरलेल्या आयर्विन पुलाने सोमवारी वयाची नव्वदी पूर्ण केली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवघ्या सांगलीकरांनी संध्याकाळी पुलावर गर्दी केली. ‘हॅपी बर्थ डे’ म्हणत साजरा केला. पुलाच्या उभारणीसाठी राबलेल्या १०४ वर्षांच्या लक्ष्मीबाई पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमाचा उत्साह वाढवणारी ठरली.ब्रिटिशकाळात १८ नोव्हेंबर १९२९ रोजी सांगलीकरांसाठी खुल्या झालेल्या आयर्विन पुलाने नव्वद वर्षे अखंड सेवा दिली. कोणतीही पडझड किंवा संकट न ओढवता सांगलीकर निश्ंिचत मनाने पुलावरुन प्रवास करत राहिले. त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण सांगलीकरांनी आज नव्वदीनिमित्त केले. महापौर संगीता खोत, मुकुंद पटवर्धन, शिवाजीराव ओऊळकर, भालचंद्र चितळे, शंकरलाल मालू, नगरसेविका भारती दिगडे, राजेंद्र कुंभार, सुलभा ताम्हणकर, अतुल गिजरे यांच्यासह अनेकजण आजच्या क्षणाचे साक्षीदार ठरले. पुलाच्या शिलालेखासमोर आकर्षक रांगोळी व पणत्यांची सजावट केली होती. पुलाची ओवाळणी करुन व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.एखाद्या निर्जीव वास्तूचा असा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा होणे, ही रस्त्यावरील प्रवाशांसाठी नवलाईची बाब होती. त्यामुळे अनेकजण थांबून-थांबून सोहळ््यात सहभागी झाले. पुलाचा इतिहास जाणून घेतला. त्याच्यासाठी राबलेल्या लक्ष्मीबार्इंना कार्यक्रमाचे खास निमंत्रण होते. त्यांच्याकडून पुलाच्या बांधकामाचे टप्पे अनेकांनी जाणून घेतले.महापौर खोत म्हणाल्या, ‘सांगली शहराच्या वाटचालीचा अविभाज्य भाग बनलेला आयर्विन पूल आमच्यासाठी अभिमानाची वास्तू आहे. त्याच्या बांधकामाच्या साक्षीदार लक्ष्मी आजींच्या उपस्थितीने जुन्या आठवणींंना उजाळा मिळाला. त्या सध्या नातेवाईकांसोबत भाड्याच्या घरात राहताहेत. महापालिका त्यांना विश्ोष बाब म्हणून घरकुल देण्यासाठी पुढाकार घेईल’.