बागणीमध्ये मोहरम साेहळ्यास अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. येथे हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात. मंगळवारी (दि. १०) चंद्र दर्शनाने इस्लामिक नववर्षाची सुरुवात झाली. मोहरमच्या ४ तारखेला रोझावाडी येथे दर्गा सवारी, तक्क्या सवारी व तकत सवारीची स्थापना पीर अब्दुल कादर बादशाह यांच्या दर्ग्यामध्ये झाली. तेथून त्या सवाऱ्या मशिदीमध्ये विराजमान झाल्या. त्यानंतर सायंकाळी गावमध्ये सवारी व पंजांची स्थापना झाली. फकीर सवारीची स्थापना किल्ल्यातील मंत्री सवारीच्या मशिदीमध्ये झाली.
मोहरम हा सण बागणी, काकाचीवाडी व रोझावाडी या तीनही गावामध्येे एकत्र साजरा केला जातो. बागणीमध्ये मंत्री सवारी, पीर मियाँसाहेब सवारी, मोमीन सवारी, सुतारवाडा सवारी, बेदडे सवारी, फकीर सवारी, कारी मशीद सवारी अशा एकूण सात ठिकाणी, काकाचीवाडी येथे महाबरी सवारी व लाडलेसाहेब सवारी अशा दाेन ठिकाणी, तर रोजावाडी येथे दर्गा सवारी, तकत सवारी, तक्क्या सवारी अशा तीन ठिकाणी सवारीची स्थापना केली जातेे. रोझावाडीतील दर्गा सवारीला विशेष महत्त्व आहे. या सवारीची स्थापना पीर अब्दुल कादीर बादशाह यांच्या हातून झाल्याचे सांगितले जाते. बागणीतील माेहरम साेहळ्यात मंत्री सवारीला मानाचे स्थान आहे.
कोरोनामुळे दरवर्षी होणारा सातव्या व नवव्या भेटीचा कार्यक्रम तसेच ग्रामपंचायतीच्या पटांगणात होणारा विसर्जनाचा कार्यक्रम काेराेनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला.
200821\dsc_3212vv.jpg
2015 संग्रहीत भेटीचा फोटो