लोकमत न्यूज नेटवर्क
संख : श्रीसंत सयाजी बागडेबाबा महाराज यांची २७ वी पुण्यतिथी जत तालुक्यातील गोंधळेवाडी व मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी भुयार मठात साजरी करण्यात आली. मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने झाला.
मठात पुण्यतिथीनिमित्त फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी श्रीसंत बागडेबाबा महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती भजन व कीर्तनातून दिली.
श्रीसंत बागडेबाबा हे जगाची सावली होते. ते सोडून गेले असले, तरी त्यांच्या कार्यातून ते जिवंत आहेत. नागरिकांनी भक्तिमार्गाच्या वाटेवर चालत चांगले कर्म करावे, असे आवाहन तुकारामबाबा महाराज यांनी केले.
दरम्यान, श्रीसंत बागडेबाबा यांनी आयुष्यभर समाजसेवा करत समाजाशी नाळ जोडली. समाज प्रबोधन करण्याचे काम केले. गरिबांना सहकार्य केले. अंधश्रद्धेविरुद्ध लढा उभा केला. ही सेवा कायम राहावी यासाठी चिखलगी भुयार मठासाठी दोन कोटींचा निधी देणार असल्याचे आश्वासन आ. समाधान आवतडे यांनी दिले.