लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी :
वांगी (ता. कडेगाव) येथील श्रीराम गणेश मंडळाने कोरोना लसीकरण जागृती सप्ताहातून रामनवमी उत्सव साजरा केला.
कोरोना प्रतिबंधक लसीबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने श्रीराम मंडळाने गावामध्ये गाडीवर ध्वनिक्षेपकाद्वारे गीताच्या माध्यमातून जनजगृती केली आहे. त्याचबरोबर फलकांच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली आहे. कोरोना महामारीविरोधात लढा अधिक प्रबळ करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम सकारात्मक पावले टाकणारा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या काही मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये जनजागृती करणाऱ्या गाडीचे पूजन व बॅनरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी रामचंद्र शिंदे, डॉ. दीपक औंधे, असिफ पटवेकरी, मयूर पवार, अवि औंधे, ऋषी पोतदार, श्रवण हडदरे, ओंकार वाघ, सुहेल पटवेकरी उपस्थित होते.