शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गगनचुंबी ताबूतभेटीचा कडेगावात रंगला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 6:43 PM

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या  कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार  व डोळ्यांचे पारणे फेडणारा  सोहळा रविवारी  हजारो  भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा , अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला.या हुसेन दुला,या इमामो दुला अशा गजरात मोहरमनिमित्त येथे १२५  ते १५० फूट उंचीच्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी पाटील चौक येथे संपन्न  झाल्या.     

ठळक मुद्देमोहरमचा दिमाखदार सोहळाहिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेशतब्बल २०० वर्षांपासून सुरु आहे परंपराहजारो भाविकांची उपस्थिती

कडेगाव (सांगली) दि. १  :हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या  कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार  व डोळ्यांचे पारणे फेडणारा  सोहळा रविवारी हजारो  भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला.

प्यारा प्यारा हमारा देश प्यारा , अब एकीका कर दो पुकारा, हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे या ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला.या हुसेन दुला,या इमामो दुला अशा गजरात मोहरमनिमित्त येथे १२५  ते १५० फूट उंचीच्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी पाटील चौक येथे संपन्न  झाल्या. 

   हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो  भाविक आले होते. विशेषतः सांगली , सातारा, कोल्हापूर, सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.

सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर, नेर्ली आदी गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबूताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई यांचा उंच ताबूत सकाळी ११.४५ वाजता उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले.

हे सर्व ताबूत पाटील चौकात बाराच्यादरम्यान आणण्यात आले. त्यानंतर बागवान यांचा उंच, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर सातभाई पाटील, सातभाई बागवान, सातभाई आत्तार, सातभाई हकीम, या उंच ताबूतांच्या भेटी दुपारी सव्वाबाराला झाल्या .त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूदमाला ताबूत व पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे ,तांबोळी ,इनामदार व सुतार यांचे ताबूत आणले गेले.

सर्व ताबूत माना प्रमाणे एकत्रित केले गेले. त्यानंतर दुपारी दीडला ताबूत उचलण्यात आले व मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला.डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या  या  नेत्रदीपक  सोहळ्यात गगनचुंबी ताबूत पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध  झाले होते . या ठिकाणी मानाप्रमाणे सर्व ताबूतांच्या भेटी झाल्या. यावेळी  माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, खासदार संजय पाटील, कऱ्हाडचे आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख , सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आ. मोहनराव कदम, जिल्हाधिकारी विजय काळम पाटील, डॉ. जितेश कदम, भाऊसाहेब यादव ,कडेगावचे सर्व नगरसेवक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.