लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले आद्यक्रांतिकारी उमाजीराव नाईक यांनी बंड पुकारले आणि सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र करून उठाव केला. चौदा वर्षे इंग्रज सत्तेविरुद्ध लढा उभारला आणि त्यांना सळो की पळो करून सोडले होते, असे प्रतिपादन आत्मशक्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष शेखर बोडरे यांनी केले.
एम. एम. ग्रुपचे संस्थापक मोहनराव मदने यांच्या नेतृत्वाखाली पेठ (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आणि एम. एम ग्रुप यांच्यावतीने उमाजीराव नाईक यांची जयंती साजरी केली. यावेळी बोडरे बोलत होते.
यावेळी सरपंच मीनाक्षी महाडिक, उपसरपंच चंद्रकांत पवार, माजी उपसरपंच दीपक कदम, आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष शंकर पाटील, माजी उपसरपंच जयराम मदने, गोरख मदने, विकास कदम, तसेच रामोशी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जेजुरी येथून आणलेल्या ‘क्रांतिकारी ज्योती’चे स्वागत करण्यात आले.