आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालय येथे वैभव शिंदे युवा मंचच्यावतीने सिमेंटचे बाक भेट देण्यात आले.
यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. कोरोना लसीकरण तसेच कोविड सेंटर, नियमित रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. काही वेळेला रुग्णालयाच्या बाहेरील बाजूला बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. सिमेंटचे बाक मिळाल्याने नागरिकांची सोय झाली आहे.
मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, शैलेश सावंत, डॉ. प्रकाश आडमुठे, जितेंद्र पाटील, बजरंग सपकाळ, सादिक तांबोळी, अजित कांबळे, संकेत पाटील, दत्तराज हिप्परकर उपस्थित होते.
फोटो : आष्टा ग्रामीण रुग्णालयास सिमेंट भेट देताना वैभव शिंदे. सोबत डॉ. संतोष निगडी, डॉ. कैलास चव्हाण, शैलेश सावंत आदी.