वीजपुरवठा अखंड सुरू ठेवण्यासाठी रेल्वेने विविध वीज प्रकल्पांना २५.८० दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा केला. शेतकऱ्यांसाठी १.२७ दशलक्ष टन अन्नधान्य व साखर, २.८५ दशलक्ष टन खते व ५ लाख टन कांद्याची वाहतूक केली. ४.४५ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादने, १.५९ दशलक्ष टन लोह व स्टील, ४.४७ दशलक्ष टन सिमेंट, ८.१५ दशलक्ष टन कंटेनर वॅगन्स व २.९१ दशलक्ष टन ऑईल आणि इतर वस्तूंची वाहतूक केली आहे. नागपूर विभागाने २८.०८ दशलक्ष टन, मुंबई विभागाने १३.९१ दशलक्ष टन, भुसावळ विभागाने ४.८८ दशलक्ष टन, सोलापूर विभागाने ४.३६ दशलक्ष टन आणि पुणे विभागाने १.०३ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे.
फाेटाे : १७ मिरज २